Pimpri

रा.स्व.संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात उद्या २५ स्थानी पथसंचलन

By PCB Author

October 23, 2023

पिंपरी चिंचवड दि.२३ (पीसीबी) – राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी निमित्याने शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी उद्या विजयादशमी निमित्त मंगळवार दि.२४ ऑक्टोबर विजयादशमी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल २५ स्थानाहून विविध भागातील नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन निघणार आहे. घोषाच्या तालावर हे संचलन होणार असून संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी विविध भागातील संचलनात सहभागी होतील. जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.

विविध भागातील पथसंचलन स्थान व वेळ –

नगर : देहूवेळ : सायं.४.३० वाजतास्थान : डिवाईन नेस्ट समोरील मैदान, परंडवाल चौक, माळवाडी, देहू

नगर : देहूरोडवेळ : सायं. ०४:३० वाजतास्थान : लायन्स क्लब शाळेसमोरील मैदान, मामुर्डी

नगर : निगडीवेळ : सकाळी ०७:३०स्थान : स्वामी विवेकानंद शाळेजवळ काळभोर नगर

नगर : संभाजी नगरवेळ : सकाळी ०७:३०स्थान : शेषाबाई गणगे प्रशाला कृष्णा नगर

नगर : चिखलीवेळ : सकाळी ०७:३०स्थान : नागेश्वर विद्यालय क्रीडांगण पाटील नगर, चिखली

नगर : दिघीवेळ – सायं ५ वाजतास्थान : गेलेक्सी शाळा, स्वराज कॉलनी, श्री गजानन महाराज नगर भोसरी आळंदी रोड, दिघी

नगर : मोशीवेळ : सकाळी ०७:३०स्थान : सिल्व्हर गार्डनिया, बोराडेवाडी, मोशी

नगर : आळंदीवेळ : सकाळी ०७:२५ वाजतास्थान : बन्सी बाबा करवा धर्म शाळेजवळ हनुमानवाडी, केळगाव

नगर : चऱ्होलीवेळ : सायं ४.०० वाजतास्थान : फोरे स्टिया सोसायटी समोर पुणेरी स्वीट मागे, डुडूळगाव

नगर : भोसरीवेळ : संध्याकाळी ०७:००स्थान : विरंगुळा केंद्र, दिघी रोड भोसरी

नगर : इंद्रायणी नगरवेळ : सायं. ०४:०० वाजतास्थान : त्रिवृक्ष संगम दत्त मंदिराजवळील मैदान, जलवायू विहार जवळ, सेक्टर ६, इंद्रायणी नगर

नगर : संत तुकाराम नगरवेळ : सकाळी ०७:३०स्थान : सम्राट विक्रमादित्य उद्यान रेणुका गुलमोहर फेज १ समोर मोरवाडी

नगर : कासारवाडीवेळ : सकाळी ०७:००स्थान : गणेश मंदिर, दापोडी

नगर : सांगवीवेळ : सकाळी ०८:००स्थान : पि डब्लू डी मैदान साई चौक नवी सांगावी.

नगर : पिंपळे गुरववेळ : सकाळी ०७:३०स्थान : ८ते ८० उद्यान सुदर्शन चौक , सुदर्शन नगर

नगर : पिंपळे सौदागरवेळ : सकाळी ०७:००स्थान : कोकणे चौक

नगर : पिंपळे निलखवेळ : सकाळी ०७:००स्थान : म्हातोबा मंदीर चौक पिंपळे निलख

नगर : काळेवाडीवेळ : सकाळी ०६:४स्थान : काका इंटरनेशनल स्कूल समोरील मैदान रहाटनी

नगर : पिंपरीवेळ : सकाळी ०७:३०स्थान : महात्मा ज्योतिबा फुले उद्यान पवणेश्वर मंदिरा जवळ पिंपरी गाव

नगर : चिंचवड पूर्ववेळ : सकाळी ०७:००स्थान : ऑक्सीजन पार्क जवळ लक्ष्मी नगर चिंचवड

नगर : चिंचवड पश्चिमवेळ : सकाळी ०७:००स्थान : बॉडबिंटन हॉल रस्ता पवना नगर चिंचवड

नगर : वाकड/ थेरगाववेळ : सकाळी ०७:००स्थान : एक्सीबिशन मैदान दत्त मंदीर रोड वाकड

नगर : हिंजवडी, पुनावळेवेळ : सकाळी ०७.३० वाजतास्थान : बालाजी विद्यापीठ, ताथवडे

नगर : रावेतवेळ : सकाळी ०७:०० वाजतास्थान : इस्कॉन मंदिर रावेत

नगर : आकुर्डीवेळ : सकाळी ०७:००स्थान : गंगानगर आकुर्डी गावठाण दत्तवाडी