राहुल शेवाळेंच्या विरोधात राज ठाकरे उभे राहिले, तरी निवडून येणार नाहीत – मनोहर जोशी

0
724

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  भातावर माशी बसली, तर भात खराब होत नाही. राज ठाकरे यांना निवडणूक लढण्यास कुणी अडवले आहे? राज ठाकरेंनी स्वत: निवडणुकीत उभे राहावं. राज ठाकरे राहुल शेवाळेंच्या विरोधात जरी उभे राहिले तरी निवडून येणार नाहीत, असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लगावला.

मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी  मनसे लोकसभा  निवडणूक  लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. मात्र,  राज ठाकरे यांनी राज्यात विविध ठिकाणी सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. राज यांनी पंतप्रधान  मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्ला चढवत  भाजपला मतदान करु नका, असे आवाहन करत आहे.

शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या रॅलीत मनोहर जोशी सहभागी झाले होते. यावेळी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा  जोशी यांनी खरपूस समाचार घेतला.  तसेच राहुल शेवाळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही  जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.