Notifications

राहुल गांधी हे ‘आचरट राजकुमार’; अरुण जेटलींची टीका  

By PCB Author

September 20, 2018

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – राफेल करार आणि बँकांच्या थकित कर्जाच्या प्रमाणाबाबत (एनपीए) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सतत खोटे बोलत आहेत. राहुल हे ‘आचरट राजकुमार’ आहेत, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्यावर तोफ डागली. एक खोटे बोलायचे आणि ते पुन्हा पुन्हा बोलायचे ही राहुल यांची रणनीती आहे, असेही जेटली म्हणाले.