Desh

राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्षपदावर कायम राहणार – रणदीप सुरजेवाला

By PCB Author

May 28, 2019

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) –  राहुल गांधी हेच काँग्रेस अध्यक्षपदावर कायम राहणार आहेत. प्रसार माध्यमामध्ये होत असलेल्या चर्चांना  काहीही तथ्य नाही. तसेच माध्यमांमध्ये सुरु असलेली चर्चा चुकीची आहे.  राहुल गांधी यांच्या नेतृत्वावावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (मंगळवार) स्पष्ट केले आहे.  

आज रणदीप सुरजेवाला, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर सुरजेवाला यांनी राहुल गांधीच काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहतील, असे सांगून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.   गांधी घराण्याशिवाय दुसरा अध्यक्ष काँग्रेसला मिळणार आहे, अशा चर्चा राजधानीत सुरू होत्या.  मात्र,  रणदीप सुरजेवाला यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान,  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटेनी, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत, असे वृत्त ‘रिपब्लिक टीव्ही’ने  दिले होते. मात्र या  सर्व चर्चांना आता रणदीप सुरजेवाला यांनी पूर्णविराम दिला आहे.