राहुल गांधींनी केले ‘मोदी सरकार’चे कौतुक आणि म्हणाले…

0
640

दिल्ली, दि.२६.(पीसीबी) – कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषदेत झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारचं कौतुक केले.‘सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आर्थिक पॅकेज हे योग्य दिशेने टाकण्यात आलेले पहिले पाऊल आहे. लॉकडाउनचा फटका सहन करणाऱ्या शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजुर, कामगार, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तीचंचेभारतावर ऋण आहे,’ असे राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे.

पुढील तीन महिने गरिबांना ५ किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल. आठ कोटी कुटुंबांना ३ महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात ५०० रुपये, शेतकऱ्यांना २ हजार अशा अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत ३ महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याचा ८ कोटी महिलांना फायदा होणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी बीपीएल कुटुंबीयांना तीन महिन्यांपर्यंत मोफत सिलिंडर मिळणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. या योजनेत बदल करण्यात आला असून, १ ऑगस्ट २०१९पर्यंत जोडलेल्या ग्राहकांना आता याचा फायदा घेता येणार आहे. तेल कंपन्यांनी जुलै २०२०पर्यंत ईएमआय पुनर्प्राप्ती योजना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.