राहुल गांधींच्या मोदींविरोधातल्या त्या वक्तव्यावरुन लोकसभेत धक्काबुक्की

0
354

दिल्ली, दि.७ (पीसीबी) – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन लोकसभेत चांगलाच गदारोळ झालेला पाहण्यास मिळाला. राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक वक्तव्य केले होते. ” येत्या सहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मिती केली नाही तर देशातले युवक त्यांना काठीने चोपतील. घराबाहेर पडू देणार नाहीत” असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. इतकेच नाही तर मोदींचा उल्लेखही त्यांनी एकेरी केला होता. त्याचेच पडसाद लोकसभेत उमटले.

लोकसभेत शुक्रवारी राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन हंगामा झाला. हा गदारोळ इतका वाढला की खासदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. खरंतर राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चांगलाच समाचार घेतला होता. ” मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करुन स्वतःला दंडाप्रुफ करुन घेईन. माझी जनताच माझे संरक्षण कवच आहे” असे उत्तर नरेंद्र मोदींनी दिले होते.