राहुल गांधींची मोदींच्या आवाहनावर व्यंगचित्रातून ‘ही’ टीका

0
363

 

मुंबई, दि.६ (पीसीबी) – लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले.

यासोबतच, आज ५ एप्रिलला, जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावे म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली आहे. ती म्हणजे, आज रविवार ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

९ वाजायला आता अवघा एक तास राहिला असत्ने राहुल गांधीनी मोदींच्या या आवाहनावर एका व्यंगचित्रातून टीका केली आहे. ते ट्वीटरवर म्हणाले, # कोविड १९ / कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार इत्यादी सर्वांचे आभार मानण्याबरोबरच, आपल्याला हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की आतापर्यंत प्रत्येकास सुरक्षितता उपकरणे मिळाली नाहीत. विना उपकरणांचे अनेक समर्पित कर्मचारी यांना जीव धोक्यात घालण्यास भाग पाडले जात आहेत.