Desh

राहुल गांधींचा भाजपवर काव्यात्मक शैलीत निशाणा

By PCB Author

October 04, 2018

नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) – डॉलरच्या तुलनेत सातत्याने होत असलेल्या रुपयाच्या घसरणीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘महागाईचा आगडोंब उसळला आहे. लोकांमध्ये हाहाकार माजला आहे. अशा वेळी ५६ इंच छातीवाले गप्प का आहेत?’ असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजपवर काव्यात्मक शैलीत निशाणा साधला.’ रुपया गेला ७३ पार, महागाईने माजवला हाहाकार. तेल-गॅसलाही लागली आग, बाजारातही सुरू आहे भागम-भाग. ५६ इंचच्या छातीवाल्यांनो कुठवर चालणार ‘सायलंट मोड’, सांगा तरी कुठे आहे ‘अच्छे दिनचे कोड’?’, अशा काव्यात्मक शैलीत राहुल यांनी भाजपवर टीका केली आहे. बुधवारी शेअर बाजार सुरू होताच एका डॉलरची किंमत ७३ रुपये ३४ पैशावर गेली होती. त्याचा संदर्भ देत राहुल यांनी भाजपला ट्विटरवरून घेरण्याचा प्रयत्न केला.