‘रासायनिक’ प्रक्रियेद्वारे पिकवलेले आंबे विकल्यास पाच लाखांचा दंड

0
728

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – मुंबईकरांना चांगल्या आंब्याची खात्री देत रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेले आंबे खाऊ घातल्यास विक्रेत्यास तब्बल पाच लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तशी तरतूद केली असून, विक्रीचे आंबे आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झाल्यास संबंधित व्यापारी व विक्रेत्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असाही इशारा एफडीएने दिला आहे.

एफडीएकडून होऊ शकते. हे आंबे आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय चाचणीमध्ये निष्पन्न झाले तर त्यासाठी व्यापारी वा विक्रेत्यांना तुरुंगवासही होऊ शकतो, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.सुदैवाने गेल्या वर्षी मुंबईमध्ये अन्न व औषध प्रशासनाने आंब्याचे जे आठ नमुने ताब्यात घेतले त्यापैकी एकही नमुना आरोग्यासाठी घातक नव्हता.

मुंबईकरांना रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेले आंबे विकले जाऊ नयेत यासाठी एफडीएने यावर्षी एक नवी योजना सुरू केली आहे. मुंबईतील मोठ्या फळबाजारांमध्ये जाऊन विक्रेत्यांचे प्रबोधन करण्याचे कार्य एफडीएचे अधिकारी करत आहेत. रासायनिक प्रक्रिया केलेले आंबे आरोग्यास कसे त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते त्याविषयीची संपूर्ण माहिती या प्रबोधनपर कार्यक्रमात दिली जाते. त्याचा विक्रेत्यांवर चांगलाच परिणाम होताना दिसतो, असे एफडीएचे शैलेश आढाव यांनी सांगितले.