Pimpri

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीनिमित्त मंगळवारी पथसंचलन

By PCB Author

October 05, 2019

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) –   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  सांघिक परंपरेनुसार विजयादशमीनिमित्त पथसंचलन व शहरातील  विविधभागांत शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन मंगळवारी (दि.८) करण्यात आलेआहे. शहरातील २१ ठिकाणी आयोजित या शस्त्रपूजन कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवकांची विविध प्रात्यक्षिके व वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत.  

शहरातील विविध ठिकाणच्या या कार्यक्रमांपैकी रविवारी  (दि.६ ) चिंचवड गावातील‘मोरया गोसावी क्रीडा संकूल याठिकाणी सायंकाळी साडे ६ वाजता पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे  यांचे व्याख्यान होईल.  तसेच संध्याकाळी ७ वाजता पिंपरी गावातील ‘रॉयल वर्ल्ड इंग्लिश मिडीयम’ शाळेत  संघाचे प्रांत कार्यकर्ते मकरंद ढवळे यांचेव्याख्यान होईल.

तसेच  संत तुकाराम नगरमधील  एसएनबीपी  शाळेत संध्याकाळी साडे सात वाजता प्रांत कार्यकर्ते प्रकाश मिठभाकरे  यांचे  इंद्रायणी नगरमधील‘ग्लोरिअस पार्क’सोसायटीमध्ये संध्याकाळी ५ वाजता पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांचे,  आकुर्डीतील ‘कामायनी शाळा’ याठिकाणी संध्याकाळी ५ वाजता प्रांत बौद्धिक मंडळाचे सदस्य योगेश्वर घोगले यांचे, तर देहूगाव येथील ‘छत्रपती शिवाजीचौक’ येथे संध्याकाळी साडे पाच वाजता पिंपरी चिंचवड  जिल्ह्याचे संघ सहकार्यवाह बाळासाहेब लोहकरे यांचे व्याख्यान होणार आहे.

त्याचबरोबर विजयादशमीला  संघ स्थापना दिनी मंगळवारी (दि ८ )   सकाळी  ७.३० वाजता  पिंपरी- चिंचवड शहरातील  १० ठिकाणी तरुणांचे पूर्ण गणवेशात घोषणा सह (संघाचा बँड)  पथसंचलन आयोजितकरण्यात आले आहे. अधिक माहिती साठी  उमेश एकनाथ कुटे  – ९८८१२२९३३१,  गोंविंद  देशपांडे – ९८६०४५००९० यांच्या संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.