राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा.गो.वैद्य यांचे निधन

0
247

नागपूर, दि.१९ (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा.गो.वैद्य यांनी वयाच्या ९७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हि दुःखद वार्ता ट्विट करुन दिली आहे. मा.गो.वैद्य यांच्या मागे पत्नी, तीन मुली, पाच मुलं असं कुटुंब आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता निघणार असून अंबाझरी घाट या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वैद्य यांनी १९६६ पासून पत्रकारिता सुरु केली होती. अनेक विषयांवर उत्कृष्ट लेख-अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहणारे वैद्य यांनी पत्रकारिता आणि समाजसेवेच्या अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. ‘सुगम संघ’ नावाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारं हिंदी पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. गडकरी म्हणाले कि, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, जेष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते.”