राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन पिंपळे गुरव परिसरात उत्साहात

0
843

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – दसरानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन पिंपळे गुरव परिसरात उत्साहात पार पडले. पिंपळे गुरव, कासारवाडी आणि सांगवी परिसरातून एकूण २२१ स्वयंसेवक  पूर्ण गणवेषात सहभागी झाले होते. संघाचा घोष म्हणजेच लष्करी बॅंड हा नेहमीप्रमाणे या ही वर्षी आकर्षणाचा विषय ठरला. 

पथसंचलनाची सुरुवात  भगव्या ध्वजाला सुवासिनींनी ओवाळून करण्यात आली. पथसंचलनाचे  नागरिकांकडून सर्वदूर उत्साहाने स्वागत झाले. यामध्ये कल्पतरू आणि काशिद पार्क सोसायटीमधील नागरिक यांचा विशेष सहभाग होता. तसेच सुदर्शननगर चौकात धनगर समाज बांधवांनी आणि सृष्टी चौकात वैदू समाजाने पारंपारिक पद्धतीने संचलनाचे स्वागत केले.

संचलनाच्या स्वागतासाठी वैदू समाज, बंजारा समाज आणि धनगर समाजाचा महिला-पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. आपापल्या पारंपरिक वेशभूषा आणि रिती रिवाजांनुसार न केवळ सहभागी झाला तर त्यांनी यावेळी आपापल्या लोकगीतांचे गायनही केले.