राष्ट्रावादी काँग्रेसला मोठा धक्का; सोलापूर जिल्ह्यातील ‘हे’ दोन बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर

0
463

सोलापूर, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रावादी काँग्रेसची काय पण करु गळती काय थांबता थांबेना, राष्ट्रावादीतून अनेंक बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली तर काहींनी शिवसेनेंची पकडली आहे. यामध्ये शरद पवार यांचे निष्ठावान समजणारेच आज भाजप सेनेच्या मेगा भर्तीत समोरच्या रांगेत उभे बघायला मिऴत आहेत.  आता सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने २७ ऑगस्ट तर आ. दिलीप सोपल ३१ ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार आ. दिलीप सोपल हे राष्ट्रवादीचे अनुभवी नेते अखेर पक्षाला राम राम ठोकणार आहेत. आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेही कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल होणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या जाण्याने कॉंग्रेस आघाडीला सोलापूर जिल्ह्यात नक्कीचे फटका बसणार आहे.