Maharashtra

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर   

By PCB Author

September 09, 2019

नागपूर, दि. ९ (पीसीबी) कोकण पाठोपाठ आता राष्ट्रवादीला विदर्भात धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित दोन दिवसात समीर देशमुख यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.  

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख हे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहेत. सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचा मुलगाच आता राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याने पक्षाला मोठा  धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  अध्यक्षतेखाली  पक्षाच्या कोअर कमिटीची  महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती तसेच उमेदवारांच्या नावावरही चर्चा करण्यात आली. दिग्गज नेते पक्ष सोडत असताना राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी  कंबर कसली आहे.