राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जमाती सेलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

0
289

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुसूचित जमाती सेलच्या पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते पदभार देऊन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. चिंचवड विधानसभेच्या अध्यक्षपदी वनराज बांबळे, भोसरी विधानसभा कार्याध्यक्षपदी रोहित वाजे, महिला शहराध्यक्षपदी सुशीला जोशी, तर भोसरी महिलाध्यक्षपदी सोनाली साबळे, तर शहर युवती अध्यक्षपदी अनिता गभाले यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील होते. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जमाती सेलचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विष्णू शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शाम जगताप, शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, सामाजिक न्याय विभागाचे बाळासाहेब पिलेवार, विनोद कांबळे, उपाध्यक्ष शशिकांत घुले, शैलेश दिवेकर आदी उपस्थित होते.

संजोग वाघेरे यांनी सांगितले, की आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी पक्षाने कायम लढा उभा केला आहे. महापालिकेतील विविध सुविधा, अनुदाने, योजनांचा लाभ आदिवासी बांधवानी घेतला पाहिजे. त्यासाठी मूळ प्रवाहात आले पाहिजे. समाजकारण बरोबरच राजकारणही समजून घेतले पाहिजे. प्रा. विष्णू शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून समाजाची केलेली संघटनात्मक बांधणी निश्चित वाखाणण्याजोगी आहे.

अरुण पवार म्हणाले, की आदिवासी समाजाने सामाजकार्याबरोबरच राजकारणात सक्रीय व्हावे. आपले अस्तित्व आणि अस्मिता टिकवून ठेवावी. शहर पातळीवर उदयाला येणाऱ्या विष्णू शेळके यांच्यासारख्या उच्च शिक्षित नेतृत्वाला साथ द्यावी, असे आवाहनही पवार यांनी उपस्थितांना केले.

शहरभर विखुरलेल्या आदिवासी समाजाला एकसंघ करण्याची गरज होती. प्रा. विष्णू शेळके यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभा असेल, असे आश्वासन शाम जगताप यांनी दिले.
शहरात प्रथमच एखाद्या पक्षाच्या माध्यमातून अशा स्वरुपाची आदिवासी बांधवांची कार्यकारणी जाहीर होण्याची वेळ असून खऱ्याअर्थाने आदिवासी समाज संघटीत झाला आहे. समाजाचे अस्तित्व ठळक स्वरुपात जाणवताना दिसत असल्याचे तानाजी जवळकर यांनी सांगितले.

प्रा. शेळके यांनी सांगितले, की तीनही विधानसभा व एकूण ३२ प्रभागाच्या कार्यकारणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. पिंपरी चिंचवड शहरात जवळपास सव्वालाख आदिवासी बांधव वास्तव्यास असून, कोळी महादेव, ठाकर, कातकरी समाजाबरोबरच भिल्ल, गोंड, परधान, कोरकू, कोलाम, पारधी, वारली, आंध समाजही शहरात मोठ्या प्रमाणात राहत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ वालकोळी यांनी, तर आभार प्रभाकर घोटकर यांनी मानले.