“राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली, मात्र ओहोटीनंतरच भरती सुरु होते”. खडसेंच स्वागत करत रोहित पवारांचं ट्विट

0
246

मुंबई, दि.२१(पीसीबी) : एकनाथ खडसे यांचा हा निर्णय म्हणजे भाजपासाठी झटका आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कारण पक्ष एका ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला मुकणार आहे. पण खडसे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्या पक्षावर त्यांनी कधीकाळी खूप टीका सुद्धा केली होती. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले होते.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एकनाथ खडसे प्रवेश करणार कि नाही? यावर गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चा रंगल्या होत्या. आणि अखेर आज हो नाही करत आज स्वतः एकनाथ खडसेंनीच शुक्रवारी ‘राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणार असल्याचं’ घोषित करत अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आणि आता खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

खडसेंच्या या निर्णयामुळे भाजपा मध्ये नाराजीची लाट उसळली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. रोहित पवारांनी या संदर्भात ट्विट करत “राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते.” अशा आशयाचं ट्विट करत रोहित पवारांनी एकनाथ खडसेंच वेलकम केलं आहे.