राष्ट्रवादी काँग्रेसच्या `भाजपा चलो जाव` मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद

0
512

– नगरविकास खात्यामार्फत सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकऱणांची होणार चौकशी

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्टाचाराविरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसने आज अभूतपूर्व मोर्चा काढून एल्गार पुकारला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील हे पहिलेच यशस्वी शक्तीपरिक्षण अगदी दणदणीत झाले. गव्हाणे यांनी आपली मोठी ताकद दाखवून दिली. भाजपाला सत्तेतून घालविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते खूप आक्रमक झाल्याचे दिसले. आजवर भाजपाने महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकऱणांची अनेक नेत्यांनी चिरफाड केली. २०२२ मध्ये राष्ट्रवादी सत्तेत येणारच अशी ग्वाही या मार्चाच्या माध्यमातून सर्व नेत्यांनी दिली. भाजपातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची राज्याच्या नगरविकास खात्यकडून चौकशी कऱण्यात येणार असल्याचे यावेळी योगेश बहल यांनी सांगितले.

चिंचवड स्टेशन येथूल वाजतगाजत निघालेला हा पायी मार्चा भाजपा निषेधाच्या घोषणा देत तासाभराने महापालिका भवनावर पोहचला. तब्बल एक किलोमीटर पर्यंत मोर्चाची गर्दी असल्याने पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. टाळ मृदंग, डफ, राष्ट्रवादीचे झेंडे हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे पाटील, माजी अध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, शकुंतला धराडे यांच्यासह महिलाध्यक्ष कविता आल्हाट, युवकाअध्यक्ष इम्रन शेख, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहुल भोसले, विरोधी नेते राजू मिसाळ यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग होता.

महापालिका भवनासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यावेळी
अजित गव्हाणे आपल्या भाषणात म्हणाले, देशाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामकृष्ण मोरे सर यांनी शहरात विकास कामे केली. देशातील उत्कृष्ट शहर म्हणून पिंपरी चिंचवडचे नाव अजित दादांनी केले. मात्र, गेल्या पाच वर्षांत भाजपाचा एक नेता या शहरात आला नाही. दादांनी शहरावर जीवापाड प्रेम केले, त्यांच्या नेतृत्वाखाली ३० वर्षे विकास कामे केली. शहर एका वेगळ्या टप्प्यावर नेण्याचे काम केले. पाच वर्षांपूर्वी भाजपा सत्तेत आले. ज्यांना आजितदादांनी मोठे केले त्यांनीच गद्दारी केली. आता या निवडणुकित जनता त्यांना जागा दगाखविल्याशिवाय राहणार नाही.
भाजपाने पाच वर्षांत एकही आश्वासन पूर्ण केले नाही, फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केला. त्यासाठीच आम्ही ठरवले की, यांना आता घालविले पाहिजे. आज शहरात एकही काम दाखवा की जे भाजपाने केले असे सांगता येईल, मी अशी १० कामे दाखवतो जिथे भाजपाने भष्टाचार केलाय. प्रत्येक कामात एस्टिमेट पासून भ्रष्टाचार केला. सगळ्या कामांत सल्लागार त्यांचेच, भागीदारी त्यांचीच असते. भाजपा नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा दिला कारण भाजपा नगरसेवकांना तिथे कुठलेही स्वातंत्र नाही. गेल्या पाच वर्षांत महापालिकेची भारत पाकिस्तान सारखी यांनी अक्षरशः फाळणी केली. महापालिकेत बजेट मंजूर करून नंतर भाषणे केली. पाशवी बहुमताच्या जोरावर विषय मंजूर केले. त्यामुळेच आता येत्या निवढणुकित जागा दाखवून द्यायची आहे. आज पिंपरी चिंचवड महापालिकेची ओळख भ्रष्टाचारी महापालिका अशी झाली. खंडणी प्रकऱणात माजी उपमहापौराला, तर लाचखोरीत स्थायी समिती अध्यक्षाला अटक झाली. विकास कामे झाली असे भाजपाचे नेते म्हणतात, पण तळवडे, चिखली परिसरात आजही जमिनीचे भाव सर्वात कमी आहेत. विकास झाला असता तर भाव वाढले असते, असेही गव्हाणे म्हणाले.

योगेश बहल म्हणाले, मोदी लाटेत निवडूण आलेली ही मंडळी. कुटुंबियांना टेंडर देऊन त्यांनी शहर वाटून घेतले. प्रत्येक टेंडरमध्ये रिंग होते. सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः लूट केली. पाच वर्षांत १७,००० कुत्र्यांची नसबंदी बाकी होती असे पालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, पण नंतर तोच आकडा ७१ हजार कुत्र्यांवर दाखवला आणि ६ कोटी २८ लाख खाल्ले. भाजपाचा सरचिटणीस कोण आहे ज्यांनी ६ कोटी २८ लाखाचा मलिदा खाल्ला त्याची चौकशी कऱणार. अनधिकृत फ्लेक्स मध्ये सरचिटणीसानेच पैसे खाल्ले. या प्रकऱणांचे आम्ही प्रशानाला पुरावे दिले, तीनवेळा पत्र दिली पण कारवाई झाली नाही. शिवकृपा सर्व्हिसेस मध्ये २९ कोटी रुपयांच्या अनुभवाचे खोटे दाखले दिले. पॅरामेडिकल स्टाफ नाही, मात्र अशा परिस्थितीत प्रशासनाने भाजपाच्या भागीदारीत काम केले. स्मार्ट सिटीत मोठी लूट केली. भाजपा नेत्यांनी शहर वाटून घेतले. टेक्निकल सॅक्शन न घेताच कामे केली. आता अजित दादांनी सांगितले आहे की, राज्याच्या नगरसविकास मार्फत चौकशी लावतो. त्यामध्ये जे कोणी अधिकारी पदाधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे बहल यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले, कचऱ्या पासून पाण्यापर्यंत, बिल्डिंग, नदी , खोदाई अशा सगळ्यात भाजपाने पैसे खाल्ले. सगळ्या कामांत यांचेच ठेकेदार आहेत. चुलते, पुतणे, भाचे असे सगळे या ठेकेदारीत सामिल झालेत. भ्रष्टाचाराचा कहर झाल्याने आता निवडणुकित भाजपाला घरा रस्ता दाखवा.
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, भाजपाने २०१७ मध्ये मूर्ती घोटाळा वाजवला. राष्ट्रवादीला क्लिनचिट मिळाली, पण सत्ता गेली. स्थायी समितीत ४ टक्का नाही तर दुपटीने टक्केवारी चालते. दोन्ही पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक भागीदार आहेत. पाच वर्षांत भाजपा आणि राष्ट्रवादीची तुलना करा.
प्रा. कविता आल्हाट, माजी महापौर मंगला कदम, कामगारनेते काशिनाथ नखाते, विनायक रणसुंभे यांचीही भाषणे झाली.