Banner News

राष्ट्रवादीला धक्का; प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज अवैध

By PCB Author

October 05, 2019

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत  अवैध ठरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहूल कलाटे यांनीही चिंचवड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता कलाटे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपचे शंकर पांडुरंग जगताप, विजय वाघमारे, राजकुमार घनशाम परदेशी व प्रकाश भाऊराव घोडके यांचेही उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत.  तर भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीतून भाजपचे शहराध्यक्ष व  आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे.