मुंबई, दि. १५ (पीसीबी) – कोल्हापुरातील हतकणंगले मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आज (शनिवार) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माने यांना शिवबंधन बांधले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, कोल्हापूरातील शिवसेने नेते संजय मंडलिक आदी उपस्थित होते. काही दिवसापूर्वीच माने यांचे चिरंजीव धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.