राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
846

मुंबई,  दि. २२ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवार) भाजपमध्ये प्रवेश केला. भारती पवार यांना दिंडोरी मतदारसंघातून लोकसभेची  उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

पवार म्हणाल्या की, आज मला मोठा परिवार मिळाला, यामुळे मला प्रेरणा मिळेल. भाजप हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे.  देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विकासाच्या मुद्द्यावरच मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.  दिंडोरीमध्ये अनेक वर्षे कामे करून न्याय मिळाला नाही, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, भारती पवार यांच्या भाजपमध्ये प्रवेशाने दिंडोरीचे विद्यमान खासदार भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. चव्हाण  हे  गेल्या १५ वर्षापासून खासदार  असून   भाजपचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे.