राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकल्याने माझ्यावर घोटाळ्याचे आरोप – चंद्रकांत पाटील

0
558

मुंबई, दि. २७ (पीसीबी) –  राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकल्याने माझ्यावर घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत, असा पलटवार राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आज (गुरूवार) केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातील भूखंड खोटाळ्याचे आरोप राष्ट्रवादीने केले होते. यावर उत्तर देताना  चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीने केलेले सर्व आरोप  फेटाळून लावले आहेत. तसेच वेळ आल्यास जयंत पाटलांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असा इशाराही दिला आहे.

दरम्यान,  भूखंड घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली . याबाबत आज विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली. तर विधानसभेत विरोधकांनी भूखंड घोटाळ्यावरून गोंधळ घातला . तर सत्ताधाऱ्यांकडून आमचा आवाज दाबला जात  आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.