राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पक्षाचाच समारोप करू – पंकजा मुंडे

0
612

बीड , दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही,  असा निर्धार राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

शनिवारी (दि.२३) परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.  यावर  बोलताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की,  दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ज्यांना राजकारणातून हद्दपार केले होते, त्याच लोकांनी परळीत परिवर्तन सभेचा समारोप ठेवला आहे. खरेतर त्यांच्या परळीतील नेत्याने यात्रेचा शुभारंभ परळीतून करायला हवा होता, परंतु समारोप ठेवला आहे. याच दिवशी आम्ही येथे येणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही, असे पंकजा म्हणाल्या.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे ७०  वर्षाचे खरकटे आम्ही काढले आहे.  खंडणीखोर आणि गुन्हेगारी मुंडें साहेबांनी संपवली. आता राष्ट्रवादीने फक्त कार्यकर्ते पोसले आणि आता यात्रा काढत आहेत. गळे काढणारे काय हल्ला करणार, असा टोला त्यांनी  धनंजय मुंडेंना लगावला.