राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना उतारवयात त्रास देऊ नये – सुभाष देशमुख  

0
620

पंढरपूर, दि. ११ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, आता पवारांचे वय झाल्याने उतारवयात त्यांनी त्रास देऊ नये. पवार सध्या राज्यसभेचे खासदारही आहेत , असा सल्ला राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी  पंढरपुरात  भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.  यावेळी देशमुख बोलत होते. पक्ष सांगेल तेथून आपली  निवडणूक लढवण्याची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माढ्यातून पवार साहेबांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह  त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. यावर येथून निवडणूक लढवण्याबाबत विचार करू, असे पवार यांनी म्हटले आहे. परंतु    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी  पवारांना या वयात दगदग करायला लावू नये. पवार रिंगणात उतरले तरी कमळ चिन्हावर आमचा उमेदवार नक्की त्यांच्या विरोधात उभा राहील, असेही देशमुख यांनी सांगितले.