Maharashtra

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

By PCB Author

September 18, 2020

मुंबई, दि.१८ (पीसीबी) | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भातली माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. माझ्या संपर्कात जे लोक आले होते त्यांनी स्वतःची करोना टेस्ट करुन घ्यावी. लवकरच मी करोनावर मात करुन आपल्या सेवत दाखल होईन. सध्या माझी तब्येत उत्तम आहे असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. आजच उर्जामंत्री नितीन राऊत यांना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यापाठोपाठच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.
हसन मुश्रीफ

— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) September 18, 2020

आजच उर्जामंत्री नितीन राऊत यांना करोनाची बाधा झाली. नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातली माहिती दिली होती. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना करोनाची चाचणी करुन घेण्याचे आवाहनही केले होते. ज्यापाठोपाठ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यांच्या संपर्कात आलेल्यांना करोनाची टेस्ट करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.