राष्ट्रवादीच्या अनिता वानखेडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई

0
555

औरंगाबाद, दि.१४ (पीसीबी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पैठण तालुकाध्यक्ष अनिता वानखेडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अनिता वानखेडे यांच्यावर कारवाई करत त्यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या संबंधी त्यांनी आपल्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ”पदाचा गैरवापर झाला या आशयाचे पत्र सोशल मिडीयावर गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. मात्र मला याची कोणतीही पूर्वसूचना न देता माझे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात रुपाली चाकणकर आणि हेमंत टकले यांनी माझ्यावर केले आरोप सिध्द करावेत, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.जर रुपाली चाकणकर आणि हेमंत टाकले यांनी हे आरोप सिध्द केले नाहीत तर पक्ष कार्यालयाच्या बाहेर उपोषण करणार आहे. जर माझे काही बरेवाईट झाले तर त्याला सर्वस्वी चाकणकर आणि टकले हेच राहतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान वानखेडे यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, औरंगाबादमध्ये मी एकमेव राष्ट्रवादीची पैठण तालुक्यातील महिलाध्यक्षा म्हणून काम करत आहे. मात्र तरीही या दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदारांकडून खच्चीकरण केले जात असल्याचा आरोही वानखेडे यांनी यावेळी केला.