Pimpri

राष्ट्रवादीचे व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे निधन

By PCB Author

September 25, 2020

पिंपरी,दि.२५(पीसीबी) – राष्ट्रवादीचे व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. महिन्यापुर्वीच त्यांचे थोरले बंधू आणि अंध विद्यार्थ्यांचा आश्रम चालविणारे आप्पा गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले. पंधरा दिवसांपूर्वी प्रदीप गायकवाड यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू होते.

राष्ट्रवादीचे शहरातील एक अत्यंत कार्यक्षम, धाडसी कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. पक्षातील विविध उपक्रम राबविण्याची तसेच संघटनात्मक बांधनीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. लोखंडी फर्निचर बनिविण्याचा त्यांचा स्वतःचा उद्योग होता.

प्रदीप गायकवाड यांच्या निधनामुळे शहरातील एक चांगला कार्यकर्ता गमावल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केली. विरोधीपक्षनेते राजू मिसाळ यांनीही त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.