राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल

0
325

मुंबई, दि. १८ (पीसीबी) –  अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या कथित आर्थिक व्यवहारप्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे नेते प्रफुल्ल पटेल सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात हजर झाले आहेत. इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी पटेल यांना ईडीने नोटीस बजावली होती. 

दरम्यान, यावेळी निवडणुका असल्याने तसेच आपण पक्षाचे स्टार प्रचारक असल्याने निवडणुका होईपर्यंत आपल्याला मुभा देण्यात यावी अशी विनंती प्रफुल्ल पटेल करणार असल्याची माहिती आहे. तसेच मिर्चीसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार केलेले नसल्याचे स्पष्टीकरण देत निवडणुकीच्या तोंडावर हे राजकीय षङ्यंत्र  आहे, असा आरोप पटेल यांनी केला  आहे.

वरळीत ‘सीजे हाऊस’ या इमारतीची पुनर्बाधणी पटेल यांच्या कंपनीने केली होती. या इमारतीमध्ये इक्बाल मिर्ची याच्या पत्नीच्या नावे सदनिका आहे. मिर्ची याची पत्नी हजरा मिर्ची हिने पटेल यांच्या कंपनीशी व्यवहार केला होता. तसेच सदनिका खरेदीच्या करारावर प्रफुल्ल पटेल आणि हजरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या व्यवहारातून  पटेल यांना आर्थिक फायदा झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे.