Pimpri

राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे आणि नगरसेविक स्वाती काटे यांच्यावर गुन्हा

By PCB Author

December 06, 2018

पुणे, दि. ६ (पीसीबी) – दापोडी परिसरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याविरोधात बेकायदेशीररित्या जमाव जमवून मुंबई-पुणे महामार्ग आढवत आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित आप्पा काटे, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटेसह एकूण ३७ कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.५) भोसरी पोलिसांनी केली.

नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे यांच्यासह एकूण ३७ जणांविरोधात प्रतीबंधात्मक आदेशाच भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विस्कळीत पाणी पुरवठा सुरु आहे. येथील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित काटे राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे यांच्यासह एकूण ३७ जणांनी बुधवारी दुपारी दापोडी येथील मुंबई-पुणे महामार्ग आढवून धरत आंदोलन केले होते. यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यादरम्यान शहर परिसरात प्रतिबंधनात्मक आदेश जारी करण्यात आला होता. या आदेशाचे उल्लंगन केल्याने पोलिसांनी नगरसवेक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे त्यांच्यासह एकूण ३७ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खारगे तपास करत आहेत.