राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

0
1599

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि. १५) विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, मॅरेथान व स्केटिंग  स्पर्धा घेण्यात आल्या.

मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ३०० अबालवृद्धांनी, तर स्केटिंगमध्ये ७५० मुलांनी सहभाग घेतला. आरोग्य तपासणी शिबीरात सुमारे एक हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. पिंपळेसौदागर येथील महापालिकेच्या माध्यमिक  व प्राथमिक शाळेत  तसेच परिसरातील सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त नाना काटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  नाना काटे सोशल फाऊंडेशन व  फिट अँड जॉय ग्रुप यांच्या वतीने मॅरेथान स्पर्धा घेण्यात आली. पिंपळेसौदागर परिसरातील विविध सोसायट्यांमधील सर्वच वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला. विशेषतः लहान मुलांचा सहभाग मोठा होता. जिल्हा उरो रुग्णालय औंध व तालेरा रुणालय चिंचवड  यांच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात २१५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

वाकड,पिंपळेगुरव,रहाटणी व थेरगाव परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात रक्तदाब, मधुमेह, दंतचिकित्सा, डोळे तपासणी, अस्थिरोग यांसह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे, प्रभाकर ववले, गोरक्षनाथ पाषाणाकर, देवीदास नखाते, सागर कोकणे, कुणाल थोपटे, राजेंद्र जगताप, शाम जगताप, तानाजी जवळकर, अमरसिंग अदियाल यांनी आरोग्य शिबीरांचे आयोजन केले. वाकड येथे कुलस्वामिनी महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. मोफत दुचाकी पीयूसी तपासणी करण्यात आली.

खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी युवक कांग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विराधीपक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, हनुमंत गावडे, भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक मयूर कलाटे, तुषार कामठे, संतोष कोकणे, उषा काळे, सुलक्षणा शिलवंत, प्रज्ञा खानोलकर, विक्रांत लांडे, प्रभाकर वाघेरे, निलेश डोके, विलास पाडाळे, गणेश भोंडवे, राजेंद्र साळुंखे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, मनोहर पवार, शरद बोऱ्हाडे, कैलास थोपटे, खंडू कोकणे, शाम जगताप, संदीप कस्पटे, निलेश पांढरकर, मुरलीधर ढगे, भारत केसरी विजय गावडे, अमोल बराटे यांच्यासह शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील अनेकांनी नगरसेवक नाना काटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.