राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर यांच्यावर २५ लाखांची खंडणी मागीतल्या प्रकरणी हफत्याभरात दुसरा गुन्हा

0
1695

पुणे, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि माजी महापौर दिपक मानकर यांच्या अडचणीत दिवसेनदिवस वाढ होताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी सध्या ते तुरुंगात आहेत. तुरुंगात गेल्या नंतर एका हफत्यात त्यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.  शनिवारी (दि.२७) रात्री कोथरूड पोलिस ठाण्यात एका महिलेची कोट्यावधींची फसवणूक केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर मुंबईतील एका व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून २५ लाखांची खंडणी मागीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अजय रामेश्र्वर अग्रवाल (वय ५२, रा. माहिम मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपक मानकर, रामदयाल बेहेडे (रा. कोथरुड), निशांत सुधाकर बेहेडे (रा. कोथरुड), अमित थेपडे (रा. एरंडवणे), गुरुनामसिंग भटियांनी (रा. वडगाव शेरी), बच्चूसिंग गुरुमुखसिंग टाक (रा. हडपसर), प्रदीप दत्तात्रय लांडगे (रा. भोसलेनगर) आणि तीन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय अग्रवाल आणि आरोपी सुधाकर बेहेडे यांनी काही वर्षापूर्वी भागीदारीमध्ये हडपसर येथे २ एकरचा प्लॅाट विकत घेतला होता. तेथे ते रेसिडेनशीयल आणि कमर्शियल प्रोजेक्ट करत होते. या दरम्यान अग्रवाल यांच्या संमती शिवाय आरोपी सुधाकर बेहेडे यांनी प्रकल्पातील दुकाने आणि फ्लॅट त्यांच्या संमती शिवाय विकून टाकले. यामुळे अग्रवाल आणि बेहेडे यांच्यात वाद झाला आणि आरोपींनी अग्रवाल यांना बंदूकीचा धाक दाखवून दिपक मानकर यांच्या कार्यालयात नेऊन कोऱ्या आणि लिखित स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या आणि २५ लाखांची खंडणी मागितली, असे तक्रारीत फिर्यादी अग्रवाल यांनी म्हणटले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.