राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर यांना कारागृहात मिळणार घरचे जेवण आणि औषध

0
974

पुणे, दि. २७ (पीसीबी) – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप आत्महत्याप्रकरणी न्यायालयीने कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर यांना मोक्का न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी कारागृहात घरचे जेवण आणि औषधे देण्याची परवानगी दिली आहे. दिपक मानकर यांना डायबेटीस आणि हायपर टेन्शनचा आजार आहे. यामुळे त्यांनी कारागृहामध्ये घरचे जेवण आणि औषधे देण्यात यावी म्हणून मोक्का न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर आज (सोमवार) मोक्का कोर्टाचे विशेष न्यायाधीशांनी सुनावणी घेऊन मानकर यांना कारागृहात घरचे जेवण आणि औषधे देण्याची परवानगी दिली.   

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांनी २ जूनला रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर यांचे नाव घेतले होते. यामुळे अटक होण्याच्या भितीने मानकरांनी जिल्हा सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पोलिसांना शरण येण्यास सांगितले. पोलिसांना शरण येताच त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना मोक्का लावून कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र कोठडीच्या काळात त्यांचा मुक्काम ससून रुग्णालयात जास्त होता. यामुळे कोर्टाने त्यांना पुन्हा कोठडी सुनावली होती.