राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसावानी यांच्यावर जीवघेणा हल्ला

0
472

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत आणि कोयत्याने वार करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर सात जण फरार आहेत. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या नातेवाईकांच्या हॉटेलवर घडला. दरम्यान, पिंपरी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.