राष्ट्रवादीचे खासदार तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
769

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते आणि खासदार तारिक अन्वर यांनी आज (शनिवारी ) सकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राफेल प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली होती. त्यानंतर नाराज झालेल्या तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. अन्वर हे बिहारमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत.

अन्वर हे मुळचे काँग्रेसचेच आहेत. त्यांनी राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद सांभाळले आहे. तसेच त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे.तर १९९९मध्ये सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान होण्याला शरद पवार आणि त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर त्या दोघांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती.