Maharashtra

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरेंचा तूर्तास शिवसेना प्रवेश नाही   

By PCB Author

August 29, 2019

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – शिवसेना प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज (गुरूवार) येथे सांगितले. त्यामुळे त्यांचा शिवसेना प्रवेश तूर्तास लांबणीवर पडला आहे.

अवधूत तटकरे यांनी आज दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे आजच त्यांचा शिवसेना प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र, तटकरे व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये केवळ रायगडमधील राजकीय परिस्थितीवरच चर्चा झाल्याचे समजते.

या भेटीबाबत अवधूत तटकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंची भेट झाली. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत त्यांना सांगितले. शिवसेना प्रवेशाबद्दल आज काहीही चर्चा झाली नाही. मतदारसंघातील  कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले.