Maharashtra

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना इंजेक्शन देऊन ठार मारण्याची धमकी; फेसबुकवर पोस्ट

By PCB Author

April 19, 2019

पालघर, दि. १९ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नालासोपारा येथील महेश खोपकर नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शरद पवार केवळ आश्वासनं देतात. करत काहीच नाहीत. यांना इंजेक्शन देऊनच ठार मारणार, अशी पोस्ट महेश खोपकरने केली आहे.

खोपकरने ही धमकीची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. या सर्व प्रकाराचा स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महेश खोपकर याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन, त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.