Maharashtra

राष्ट्रवादीकडून मनसेचे ‘कल्याण’ होणार ?

By PCB Author

March 05, 2019

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मनसे महाआघाडीत घेण्यास काँग्रेसने आपला विरोध कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे  राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनसेला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. आता राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील कल्याण लोकसभेची जागा मनसेला देऊ केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. 

मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली आहे.   येत्या सोमवारपर्यंत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. तर  मनसेला महाआघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. मात्र काँग्रेसचे मन वळविण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यश येईल, असे बोलले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीत कल्याणची जागा मनसेला मिळाल्यास राजू पाटील किंवा त्यांचे बंधू रमेश पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आता काँग्रेस मनसेचा आघाडीत समावेश करून घेण्यास राजी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.