राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रांगेत थांबून बजावला मतदानाचा हक्क

0
495

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) –  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला. देशाचे प्रथम नागरिक असलेल्या कोविंद यांनी सर्व सामान्य नागरिकांप्रमाणेच रांगेत उभे राहून मतदान केले. आज सकाळी (रविवार) राष्ट्रपती भवन परिसरातील डॉ. राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांची पत्नी सविता कोविंद  त्यांच्यासोबत होत्या.

लोकशाहीमध्ये एक मत एक मूल्याच अधिकार दिला आहे. त्यामुळेच आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान करणाऱ्या अनेक व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींनी कोणताही अभिनिवेश न बाळगता रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.

राष्ट्रपती  हे कानपूरचे रहिवासी आहेत. परंतु राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे मतदान राष्ट्रपती भवन परिसरातच होते. कोविंद यांच्यासह राजधानी दिल्लीतील अनेक  मोठ्या व्यक्तींनी रांगेत उभे राहून मतदान केले. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला.