इस्लामिक गतविधीवर अंकुश लावण्या संदर्भात राष्ट्रपती यांना चिंचवड पोलीस आयुक्तांमार्फत विश्व हिंदू परिषद, बजरंग दलकडून निवेदन

0
769

पिंपरी, दि, ११ (पीसीबी) – इस्लामिक जिहादी घटनांवर वचक बसावा या करिता व  इस्लामिक जिहाद, कथित धर्मनिरपेक्षवादी, अराजक व अराष्ट्रीय तंत्राच्या खोट्या व भ्रामक प्रचार तथा प्रत्यक्ष किंवा अपरोक्ष हल्ल्यावर अंकुश लावून शांतीप्रिय हिंदू समाज व राष्ट्रीय मूल्य यांचे रक्षण करण्यात यावे. यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या व पिंपरी चिंचवड जिल्हावतीने माननिय राष्ट्रपती यांना मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी बजरंग दल, प्रांत संयोजक, लहुजी धोत्रे, विभाग मंत्री, नंदकुमार कुलकर्णी, विभाग संयोजक, संदेश भेगडे, विभाग सह संयोजक, कुणाल साठे, जिल्हा कार्याध्यक्ष, धनाजीराव शिंदे, जिल्हा मंत्री, नितीन वाटकर, , जिल्हा सह मंत्री, संजय शेळके, नाना सावंत, बजरंग दल सह संयोजक, सागर चव्हाण, अभिजित शिंदे, तसेच संभाजी बालघरे, मयूर काटे, महेश बालघरे, स्वप्नील नखाते आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते अशी अधिकृत माहिती विश्व हिंदू परिषद, जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी दिली.

काही वर्षांपासून अलगाववादी मानसिकतेच्या माध्यमातून चालणाऱ्या इस्लामिक जिहादी संघटनेद्वारे चालविल्या जाणाऱ्या हिंदूद्रोही व देश विरोधी इस्लामिक जिहादी गतीविधीमुळे देशात हिंदू समाज आणि हिंदूच्या धार्मिक स्थळांवर अनेक हल्ले होत आहेत. याशिवाय मॉब लिचिंगच्या छोट्या छोट्या घटनांना त्या खूप मोठ्या आहेत असे भासवून भोळ्या भाबड्या ग्रामीण नागरिकांना, गोरक्षकांना, श्रीराम भक्त तसेच अन्य राष्ट्रभक्तांना बदनाम करण्याचे षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्वांना आळा बसण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.