रावेत येथील पुलावरून भरधाव कंटेनर नदी पात्रात कोसळला; जीवीत हानी नाही

849

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – मुंबई-बंगळुरू महामार्गावर रावेत येथील पुलावरून भरधाव कंटेनर ४० फुट उंचीवरून नदीपात्रात कोसळला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी सव्वा आठच्या सुमारास घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झालेली नसून चालक मात्र आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पवना नदीवरील समांतर पुलाच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेतून खाली पडला. कंटेनरसोबत चालक रमेश विठ्ठल बुधावंत खाली पडला. मात्र नदीपात्रातील पाण्यामुळे किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर देहूरोड येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान,  देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पूलावरील बघ्यांची गर्दी हटविताना पोलीसांना बरीच कसरत करावी लागली. पोलिस तपास करत आहेत.