Chinchwad

रावेत येथील कारमध्ये आढळला दोघांचा मृतदेह; आत्महत्येचा संशय

By PCB Author

November 23, 2018

रावेत, दि. २३ (पीसीबी) –  रावेत येथील कारमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) रात्री साडेआठच्या सुमारास कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेंटोसा हॉटेल जवळून उघडकीस आली.

अमोल रविंद्र शितोळे (वय ३०, रा. कासारसाई) आणि अनुपमा नवनाथ कारंडे ( वय ४१, रा. वाकड) अशी मयत दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास रावेतजवळील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेंटोसा हॉटेल समोरील एका कारमध्ये अमोल आणि अनुपमा या दोघांचे मृतदेह आढळून आले. दोघांनी विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नाही. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.