रावेतमध्ये घरातील हिटरचा शॉक लागून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

0
978

रावेत, दि. ५ (पीसीबी) – घरात पाणी गरम करण्याच्या हिटरचा शॉक लागून एका चार वर्षीय चिमुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.४) दुपारी चारच्या सुमारास रावेतमधील शिंदेवस्तीत घडली.

दिव्या कैलास गराड (वय ४, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या ही तिच्या आई-वडिलांसोबत रावेत येथील शिंदेवस्ती मध्ये भाड्याच्या खोलीत राहत होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते दुसऱ्या भाड्याच्या खोलीत रहायला चालले होते. यामुळे ते घरातील सामान आवरत होते. यादरम्यान घरातील पाणी गरम करण्याचा हिटर चालूच राहिला. दिव्या खेळत खेळत घरात गेली आणि तिने हिटरला हातलावला. ज्याचा जबरदस्त शॉक लागून ती जागेवरच बेशुध्द पडली. घरच्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दिव्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.