Chinchwad

रावेतमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

By PCB Author

June 11, 2019

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई बॅगलोर हायवेवरील सेन्टोसा रिसॉर्टसमोर, रावेत येथे घडली.

सरदार विलास पोवार (वय ४७, रा. पुनाळ ता. पन्हाळा, जि. कोल्हापुर) असे मयत पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वसीम महंमद शेख यांनी सोमवार (दि.१०) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ च्या सुमारास सरदार पोवार हे रावेत येथील सेन्टोसा रिसॉर्टसमोरील रस्ता ओलांडत होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहन चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सरदारचा मृत्यू झाला. देहुरोड पोलीस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.