Chinchwad

रावेतमधील पवना नदीत बुडून अज्ञात इसमाचा मृत्यू

By PCB Author

October 17, 2018

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – रावेत येथील पवना नदीच्या बंधाऱ्याजवळ पोहायला गेलेल्या एका अज्ञात इसमाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) सकाळी आठच्या सुमारास समोर आली.

मयत इसमाची ओळख अद्याप पटली नाही. मात्र अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी हा इसम रावेत येथील पवना नदीच्या बंधाऱ्याजवळ आंगोळीसाठी गेला होता. यावेळी नदीचा प्रवाह जास्त असल्याने तो बंधाऱ्याजवळ बुडाला. यादरम्यान काही स्थानिक नागरिक बंधाऱ्यावर गेले असता एकजण नदीत बुडाला असल्याचे त्यांना समजले. त्यांनी त्वरीत याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. घटनास्थळी तातडीने रहाटणी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी त्या इसमाचा मृतदेह बाहेर काढला आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे ५५ वर्ष असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.