रावण सेनेची धरपकड सुरु; मयत गुंड अनिकेत जाधव याच्या हत्येच्या दिवशी निगडी परिसरात माजवणार होते दहशत

0
3409

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – रावण टोळीतील कुख्यात गंड अनिकेत जाधव याचा मागील वर्षी २० नोव्होंबर रोजी वर्चस्व वादातून विरोधीत टोळीने खून केला होता. त्या दिवशीची आठवण म्हणून रावण टोळीतील गुंडांनी मंगळवारी निगडी परिसरात दहशत माजवण्याचा प्लॅन केला होता. मात्र पोलिसांनी हा प्लॅन हाणून पाडला आहे.

रावण टोळीतील कुख्यात गंड अनिकेत जाधव याचा मागील वर्षी २० नोव्होंबर रोजी वर्चस्व वादातून विरोधीत टोळीने खून केला होता. या दिवसाची आठवण म्हणून रावण टोळीतील गुंड हे निगडी परिसरात मंगळवारी दहशत माजवण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. यावर रावण टोळीतील गुंडांना अटक करण्यासाठी पोलिसांनी निगडी परिसरात ठिकठिकाणी नाका बंदी, शस्त्र दल आणि पेट्रोलिंग वाढवले होते. तसेच मयत अनिकेत जाधव याचा खून ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी देखील पाळत ठेवण्यात आली होती. मात्र पोलीसांच्या या तयारीची कुनकुन रावण सेनेला लागली आणि त्यांनी पळकाढला. यामुळे आता या टोळीतील गंडांची धरपकड करण्यास पोलीसांनी सुरुवात केली आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मयत अनिकेत जाधव याच्या वाढदिवसा निमित्त रावण टोळीतील गुंडांनी अनिकेत याची हत्या झालेल्या ठिकाणी तलवारीने केक कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.