Desh

रायबरेलीतून सोनिया गांधींच्या विरोधात माजी काँग्रेस नेता रिंगणात

By PCB Author

April 04, 2019

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – रायबरेलीतून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात भाजपने माजी काँग्रेस नेता दिनेश प्रताप सिंग यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

दिनेश प्रताप सिंह हे २०१६ मध्ये दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. २०१८ मध्ये  काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभेला त्यांना आता  भाजपने थेट सोनिया गांधीविरोधात मैदानात उतरवले आहे.

दरम्यान, आझमगडमधून भोजपुरी गायक दिनेश लाल यादव भाजपकडून रिंगणात आहेत. दिनेश लाल यादव यांना ‘निरहुआ’ नावाने ओळखले जाते. आझमगड हा सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा बालेकिल्ला आहे.