रायगड येथील तळोजा एमआयडीसीत भीषण स्फोट; दोन जण गंभीर जखमी; १४ गावांना जबरदस्त हादरे

0
896

रायगड, दि. २९ (पीसीबी) – तळोजा एमआयडीसी येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत प्रचंड मोठा स्फोट झाल्याची घटना आज (सोमवार) सकाळी घडली. या स्फोटात २ दोन जण गंभीर जखमी झाले असून आसपासच्या एकूण १४ गावांना जबरदस्त हादरे बसले आहे. या हादऱ्यांमुळे परिसरातील काही घरांना तडे गेले आहेत. स्फोट झालेल्या कंपनीला स्थानिक लोकांनी घेराव घातला आहे.

आगीचा भडका प्रचंड मोठा आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा असल्याने ही आग पसरू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान सातत्याने या आगीवर पाण्याचा मारा करत आहेत. मात्र, अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. आगीत कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. रायगड पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत.