Maharashtra

रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर दोन महिन्यांसाठी बंदी

By PCB Author

July 07, 2018

रायगड, दि.७ (पीसीबी) – रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यंटकांना बंदी घालण्यात आली आहे.  पुढील दोन महिन्यांसाठी कर्जत आणि खोपोलीतील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी असेल.

पावसाळ्याच्या आनंद लुटण्यासाठी खोपोली आणि कर्जतमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्य धोके  लक्षात घेत कर्जतच्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेश काढले आहेत.

५ जुलै २०१८ ते ४ सप्टेंबर २०१८ दरम्यान परिसरातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असेल. तसेच धबधबे, धरण नदी परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे.