रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्याप्रकरणी आरोपींची निर्दोष सुटका

0
607

रायगड, दि.२५ (पीसीबी) – रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या मागे असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा  संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी २०१२ रोजीला  हटवला होता. या प्रकरणी पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या ७३ जणांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर दरोडा घालण्याचा आणि पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी वापरलेल्या गाड्याही जप्त केल्या होत्या. माणगाव सत्र न्यायालयात या खटल्याचा निकाल लागला असून पुराव्याअभावी ७३ जणांची सत्र न्यायाधीश जहांगीर यांनी निर्दोष सुटका केली आहे. या निकालाच्या अनुषंगाने माणगाव न्यायालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.