राम शिंदेंना गटातटाच्या राजकारणात रस, मला विकास करायचाय, रोहित पवारांचं प्रत्युत्तर

0
207

पुणे, दि. 31(पीसीबी) : भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर तीस लाखांच्या बक्षीसावरुन जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला आ. रामदार रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. गावात गटतट नसावेत असा माझा प्रामाणिक उद्देश आहे पण त्यांचा उद्देश गटतट असावेत असा आहे, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी शिंदे यांना दिलंय.
गावात गटतट असावेत असावे असा प्रामाणिक हेतू त्यांचा असावा मात्र माझा हेतू गटतट नसावेत असा आहे. गावच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र येत असतील तर त्याला काय हरकत आहे”, असा सवाल त्यांनी राम शिंदे यांना केला.

बक्षीस जाहीर करण्यापाठीमागे माझा प्रामाणिक हेतू होता की गावकऱ्यांनी तट तट विसरुन विकासाचं राजकारण करावं. त्यांना विकासचं काम कळत नसेल. त्यांना गटतट कळत असतील तर त्याला मी काय करु”, असा टोला रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावला.
एकतर राम शिंदे काय बोलतात त्यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे, असा टोला लगावत लोकांच्या हिताच्या दृष्टीनेच मी या पुढे काम करत राहील”, असं रोहित पवार म्हणाले.