Pimpri

राम मंदिर भूमिपूजन निमीत्त पिंपरी चिंचवड शहरात दहा लाख घरात बुंदीचे लाडू वाटप होणार

By PCB Author

August 04, 2020

पिंपरी, दि.4 (पीसीबी): उद्या 5 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र अयोध्या इथे प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्याने पिंपरी चिंचवड शहरातील दहा लाख घरात बुंदीचे लाडू वाटप करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी मला माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्याच्ये भाजपा अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडून प्रेरणा मिळाली. आपण सर्वांनी आपापल्या घरातून हा सोहळा साजरा करावा व त्याद्वारे आपला परिसर, राज्य व राष्ट्र राममय करावे, अशी विनंती आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.